हजारो गोरगरीब रुग्णांना जीवनदान देणारे डॉ. अखिल अग्रवाल यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
24 जुलै 2026
हिंगोली | प्रतिनिधी :
हिंगोली शहरातील नामांकित युवा डॉक्टर डॉ. अखिल अग्रवाल यांचा वाढदिवस विविध स्तरांवर उत्साहात साजरा करण्यात आला. आपल्या वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून त्यांनी हजारो गोरगरीब रुग्णांचे प्राण वाचवून समाजात विश्वासार्ह डॉक्टर म्हणून वेगळी ओळख निर्माण केली आहे.
हिंगोली येथील लक्ष्मी लाइफ केअर हॉस्पिटल सुरू झाल्यापासून रुग्णांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याबरोबरच शासनाच्या विविध आरोग्य योजनांचाही लाभ मिळवून देण्यात येत आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांनाही वेळेत आणि योग्य उपचार मिळण्यास मोठी मदत होत आहे.
माजी नगर अभियंता अशोक अग्रवाल यांचे सुपुत्र असलेले डॉ. अखिल अग्रवाल हे अत्यंत सेवाभावी व कर्तव्यदक्ष युवा डॉक्टर म्हणून परिचित आहेत. दिवस-रात्र, २४ तास रुग्णसेवेसाठी तत्पर राहून ते रुग्णांना आवश्यक उपचार व मार्गदर्शन करत असल्याने नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी विशेष विश्वास आहे.
डॉ. अखिल अग्रवाल यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार संतोष बांगर, आमदार मुटकुळे तसेच आरोग्य क्षेत्रातील वरिष्ठ मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.
याशिवाय महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्कच्या वतीनेही डॉ. अखिल अग्रवाल यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक व वैद्यकीय कार्याचे कौतुक करण्यात आले. समाजसेवेचा हा प्रवास भविष्यातही अधिक जोमाने सुरू राहावा, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
إرسال تعليق