हट्टा येथील खून प्रकरणातील आरोपीस सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर
अँड अजय उर्फ बंटी देशमुख
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
03 ऑगस्ट, 2026
वसमत, प्रतिनिधी : हट्टा येथील गाजलेल्या खून प्रकरणातील अटक आरोपी योगेश बाळासाहेब भवर यास विद्यमान सत्र न्यायालय, वसमत यांनी जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर दि. 31 जुलै 2026 रोजी विद्यमान सत्र न्यायाधीश मा. श्री. दिनेश बी. बांगडे यांनी जामीन अर्ज मंजूर करण्याचे आदेश दिले.
फिर्यादीनुसार, दि. 31 मे 2026 रोजी रात्री सुमारे 9.30 वाजता हट्टा येथील आठवडी बाजारातील खंडोबा मंदिरासमोर गावातील प्रणव भवर, पंकज भवर, प्रल्हाद भवर, उमेश भवर व योगेश भवर यांनी संगनमत करून जीवे मारण्याच्या उद्देशाने धारदार खंजीराने हल्ला केल्याचा आरोप आहे. या घटनेत दोन व्यक्तींना पोटात खंजीराने वार करून गंभीर जखमी करण्यात आले, तसेच एका व्यक्तीचा खंजीराने वार करून खून करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याशिवाय फिर्यादीस लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या फिर्यादीवरून हट्टा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, 2023 अंतर्गत कलम 103(1), 109, 118(2), 189(2), 191(2), 191(3), 190, 352 तसेच शस्त्र अधिनियम, 1959 मधील कलम 4 व 25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपी योगेश बाळासाहेब भवर यांच्या वतीने ॲड. अजय (बंटी) पंडितराव देशमुख यांनी विद्यमान सत्र न्यायालय, वसमत येथे जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद विचारात घेऊन न्यायालयाने आरोपीस जामीन मंजूर केला.
आरोपीच्या वतीने ॲड. सतीश देशमुख, ॲड. शामकांत देशमुख व ॲड. प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड. अजय (बंटी) पंडितराव देशमुख यांनी न्यायालयात बाजू मांडली. त्यांना ॲड. शरद देशमुख, ॲड. अदित उर्फ शुभम देशमुख, ॲड. राहुल देशमुख, ॲड. योगेश खिल्लारी (पाटील), ॲड. रजत देशमुख, ॲड. अविनाश राठोड, ॲड. प्रकाश मगरे, ॲड. सुमित सातव, ॲड. श्रद्धा जैस्वाल, ॲड. आनंद खिल्लारे, ॲड. मुदस्सीर अ. रहिम, ॲड. आकाश चव्हाण, ॲड. लखन पठाडे, ॲड. गजानन घुगे, ॲड. सुमित कदम, ॲड. तुषार देशमुख, ॲड. रुपाली खिल्लारे, शेख आदिल शेख अजीस, ॲड. सचिन सोनुने, ॲड. संदीप डवले, ॲड. शिवम देशमुख, ॲड. प्रिया कुरील, ॲड. हरपालसिंग सेठी व ॲड. महावीरसिंग चौहान यांनी सहकार्य केले.
إرسال تعليق