हिंगोली ग्रामीण पोलिसांची कारवाई : १२.२५ लाखांचा रेतीसह टिप्पर जप्त; एक आरोपी ताब्यात
पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
हिंगोली, दि. 0७ऑगस्ट : हिंगोली ग्रामीण पोलिसांनी अवैध गौण खनिज (रेती) वाहतुकीविरोधात मोठी कारवाई करत सुमारे १२ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ७ ऑगस्ट २०२६ रोजी पहाटे २.१५ वाजण्याच्या सुमारास नरसी फाटा (ता. व जि. हिंगोली) परिसरात गस्तीदरम्यान ही कारवाई करण्यात आली. यावेळी एमएच ४६ एएफ ५०२२ क्रमांकाच्या भारत बेंझ कंपनीच्या टिप्परमधून सुमारे पाच ब्रास रेतीची विनापरवाना वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले.
या प्रकरणी श्रीनाथ शंकरराव काळे (वय ३०, रा. शास्त्रीनगर, जवळा बाजार, ता. औंढा नागनाथ, जि. हिंगोली) याच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक ०५३२/२०२६ दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२), महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८(७) व ४८(८) तसेच गौण खनिजे (नियमन व विकास) अधिनियम १९५७ चे कलम ४ व २१ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या कारवाईत अंदाजे २५ हजार रुपये किमतीची पाच ब्रास रेती तसेच सुमारे १२ लाख रुपये किमतीचा भारत बेंझ कंपनीचा टिप्पर असा एकूण १२ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी राजकुमार भानुदास जमदाडे यांनी फिर्याद दिली असून गुन्हा सकाळी ४.२८ वाजता हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून
पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे
पोलीस उपनिरीक्षक राहुल घुले श्रीदेवी वगे psi मेथेकर पोहका
सोनपावले . राजकुमार जमदाडे . विष्णू चव्हाण नागुलकर . खोकले यांचा कारवाईत सहभाग होता .
प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार ढेंबरे करीत आहेत.
हिंगोली ग्रामीण पोलिसांनी अवैध रेती वाहतूक व गौण खनिजांच्या बेकायदेशीर उत्खननाविरोधात कारवाईचा धडाका कायम ठेवला असून अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे यांनी सांगितले
إرسال تعليق