दुकानासमोरून आठ लाखांचा पिकअप लंपास; नोकराविरुद्ध गुन्हाहिंगोली ग्रामीण पोलिसांची कारवाई; आरोपी अटकेत, पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे



दुकानासमोरून आठ लाखांचा पिकअप लंपास; नोकराविरुद्ध गुन्हा
हिंगोली ग्रामीण पोलिसांची कारवाई; आरोपी अटकेत,
 पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे 

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
हिंगोली, दि. २ ऑक्टोबर : हिंगोली शहरातील अकोला बायपास परिसरातील दुकानासमोर उभा केलेला सुमारे आठ लाख रुपये किमतीचा महिंद्रा कंपनीचा पिकअप वाहन चोरीस गेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी एका संशयित आरोपीला अटक केली आहे. चोरीस गेलेले वाहन अद्याप पोलिसांच्या हाती लागले नसून, त्याचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशुतोष सुनील बगडीया (वय ३४, रा. विद्यानगर, हिंगोली) हे बिल्डिंग मटेरियलचा व्यवसाय करतात. त्यांचे अकोला बायपास परिसरात स्काय सिरामिक्स दुकान आहे. दुकानासमोर त्यांचा महिंद्रा कंपनीचा पांढऱ्या रंगाचा पिकअप (आरटीओ क्रमांक एमएच-३८-ई-३१२९) उभा करण्यात आला होता.
१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसात वाजेपासून ते २ ऑक्टोबर रोजी सकाळी सात वाजेच्या दरम्यान हा पिकअप दुकानासमोरून गायब झाला. वाहनाची पाहणी केली असता ते जागेवर नसल्याचे आढळून आले. त्यानंतर वाहनाच्या चावीबाबत माहिती घेतली असता, दुकानातील ड्रॉवरमध्ये ठेवलेली पिकअपची चावी फिर्यादीच्या संमतीशिवाय घेऊन वाहन नेण्यात आल्याची माहिती समोर आली.

या प्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून गजानन आदिनाथ पवार (रा. बेलोरा, ता. जि. हिंगोली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या नोंदीनुसार आरोपीला अटक करण्यात आली 

चोरीस गेलेल्या वाहनाची किंमत सुमारे आठ लाख रुपये असल्याचे पोलिसांच्या नोंदीत नमूद करण्यात आले आहे. फिर्यादीने २ ऑक्टोबर रोजी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात येऊन तोंडी फिर्याद दिल्यानंतर दुपारी १.५७ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिस पथकाची कारवाई

पोलीस अधीक्षक श्रनिक लोढा यांच्या आदेशाने तसेच पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणात पोलिस पथकाने कारवाई केली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक राहुल घुले, पोलीस निरीक्षक श्रीदेवी वगे, पोलीस कर्मचारी बाळासाहेब खोडवे, राम धुमाळे, सुरेंद्र लांडगे, वैजनाथ पवार, विठ्ठल सांगळे, अमोल पोले आणि राजानंद वाघमारे यांनी सहभाग घेतला.




Post a Comment

थोडे नवीन जरा जुने