हिंगोली शहरातील शिवप्रेमींना जाहीर आव्हान
महाराष्ट्र 24 न्यूज
16 फेब्रुवारी 20222
*सर्वप्रथम श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सर्व शिवप्रेमींना पोलीस ठाणे हिंगोली शहर चे वतीने हार्दिक शुभेच्छा
श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त महाराष्ट्र शासनातर्फे मार्गदर्शक सूचना आलेल्या आहेत त्यानुसार-
छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्सव साधेपणाने साजरी करण्यात यावा.
सांस्कृतिक कार्यक्रमाचे मोठ्या प्रमाणात आयोजना न करता सदर कार्यक्रमाचे केबल नेटवर्क अथवा ऑनलाइन प्रक्षेपण उपलब्ध करून द्यावे.
*प्रभात फेरी, बाईक रॕली अथवा मिरवणूक काढण्यात येऊ नये त्याची परवानगी नाकारण्यात आलेली आहे.*
श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम एकाच ठिकाणी आयोजित करावा.
कार्यक्रम ठिकाणी मास्क, सॕनेटायझरचा वापर करावा व सोशल डिस्टंसिंग चे पालन करण्यात यावे.
श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या दिवशी आरोग्यविषयक उपक्रम शिबिरे रक्तदान तसेच विविध आजार व त्याचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत लोकांमध्ये जनजागृती करणारे कार्यक्रमाचे आयोजन करावे सदर ठिकाणी मास्क सॕनेटायझरचा वापर करावा व सोशल डिस्टन्सींगचे पालन करावे.
तसेच covid-19 च्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने वेळोवेळी विहित केलेले सर्व नियमांचे काटेकोर पणे पालन करावे.
असे आव्हान
पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे यांनी केले आहे
إرسال تعليق