सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीतर्फे श्री शिवछत्रपती गौरव पुरस्कार जाहीर*

*सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीतर्फे श्री शिवछत्रपती गौरव पुरस्कार जाहीर*

प्रतिनिधी-/हिंगोली

  सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती हिंगोलीच्या वतीने१६, १७,१८व१९ रोजी भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या तीन दिवसीय कार्यक्रमाची रूपरेषा जाहीर करून शिवछत्रपती गौरव पुरस्कार मान्यवरांची नावे समितीच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन घोषित करण्यात आले आहे.
    येथील शासकीय विश्रामगृहात शिवजयंती महोत्सव समितीच्यावतीने १५ फेब्रुवारी रोजी कार्यक्रमाची रूपरेषा माडण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष पप्पू चव्हाण,सचिव ड्रॉ.सतीश शिंदे,कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर लोंढे,कोषाध्यक्ष नितीन अवचार,उपाध्यक्ष मिलिंद उबाळे,शिवाजी मेटकर,प्रसिद्धी प्रमुख पवन जाधव पाटील,यांच्यासह मनोज आखरे,कल्याण देशमुख, प्रा.केळे सर,पंडित अवचार, विठ्ठल सोळखे,माणिक पाटील आदीची उपस्थिती होती.तर १९ फेब्रुवारी रोजी भव्य दिव्य स्वरूपात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे.यामध्ये मैदानी स्पर्धामध्ये १६फेब्रुवारी फुटबॉल स्पर्धा सकाळी १०वाजता,१७ फेब्रुवारी रोजी कब्बडी स्पर्धा सकाळी ११ वाजता उदघाटन होणार आहे.१८ फेब्रुवारी रोजी १०वाजता वकृत्व स्पर्धा,२ वाजता भव्य कुस्त्याची दगल,दुपारी २ वाजता इतिहासिक वेशभूषा व संवाद स्पर्धा(महिला,मुली व बालकासाठी), दुपारी ३ वाजता रांगोळी स्पर्धा (महिला व मुलींसाठी),सायं ६ वाजता भव्य दीपोत्सव, तर सायं ७ ते१० पर्यंत शाहीर जलसा व शिवगीता चा कार्यक्रम(शिवशाहीर डॉ. शिवराज शिंदे) यांचे आहे.१९फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता शिवअभिषेक,सकाळी ८ वाजता ध्वजारोहण,शिव-पाळणा, शिवपूजन,आणि शिवगजर,सकाळी९ते१० वाजेपर्यंत महापुरुषांना मानवंदना व हेलिकॉप्टर द्वारे पुष्पवृष्टी,सकाळी १०ते११ पर्यंत भव्य मोटारसायकल रॅली(छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापासून),सकाळी१०:३०ते सायं ५ वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबिर व कोविड लसीकरण शिबिर,सकाळी ११ते दुपारी ३वाजेपर्यंत भव्य मिरवणूक(ढोलपथक,रथ,घोडे, लेझीम,लाठी-काठी,झांजपथक व देखावे),दुपारी ४ ते सायं ६ पर्यंत गौरव सोहळा (श्री शिवछत्रपती गौरव पुरस्कार व बक्षीस वितरण),६ वाजता भव्य दीपोत्सव,सायंकाळी ६:३०ते ७वाजेपर्यंत नेत्रदिपक अतिषबाजी(फटाके व तोफेची सलामी), सायं ७ते १० वाजेपर्यंत शिवपोवाडे व शिव-गीताचा कार्यक्रम(शिवशाहीर सुरेश जाधव) आहे,तर अशा प्रकारे भव्य दिव्य स्वरूपाचे कार्यक्रम शिवजन्मोत्सव सोहळा निमित्त घेण्यात येणार आहेत.तर शिवछत्रपति गौरव पुरस्कार प्रदान होणारे मान्यवर साहित्य क्षेत्र पुरस्कार प्रा डॉ माधव जाधव, शैक्षणिक क्षेत्र पुरस्कार व सुरेश शिंदे,क्रीडाक्षेत्र पुरस्कार नितीन चव्हाण,सामाजिक क्षेत्र पुरस्कार मीराताई कदम,कृषी व पशुपालन क्षेत्र पुरस्कार रामेश्‍वर मांडगे यांनी जाहीर करण्यात आले आहे.या सर्व कार्यक्रमाला सर्व धर्मातील शिवप्रमिनी रहावे असे आवाहन सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

أحدث أقدم