गोरेगावात सासरच्या जाचाला कंटाळून महिलेची आत्महत्या

गोरेगावात सासरच्या जाचाला कंटाळून महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

हिंगोली :  जिल्ह्यातल्या सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे एका महिलेने कुटुंबियाच्या सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केलीय. उजमा बेगम (वय २५ वर्षे ) असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे. सदरील महिलेला तिच्या कुटुंबीयांनी माहेरवरुन वीस हजार रुपये घेऊन ये, असं म्हणत तिला वारंवार अश्लील भाषेत शिवीगाळ करत आपण लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसंच जीवे मारण्याची सुद्धा धमकी देत होते.
कित्येक रात्री महिलेला उपाशी ठेवलं, कंटाळून तिने आत्महत्या केली 
  जिल्ह्यातल्या सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे एका महिलेने कुटुंबियाच्या सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केलीय. उजमा बेगम (वय २५ वर्षे ) असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव आहे. सदरील महिलेला तिच्या कुटुंबीयांनी माहेरवरुन वीस हजार रुपये घेऊन ये, असं म्हणत तिला वारंवार अश्लील भाषेत शिवीगाळ करत आपण लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तसंच जीवे मारण्याची सुद्धा धमकी देत होते.

तुझ्या माहेर वरून पैसे आणले नाही तर तुला जीवे मारून टाकू, अशा धमक्या महिलेला दिल्या जात होत्या. तसेच रात्र रात्र या महिलेला उपाशीपोटी ठेवले जात होते. त्यामुळे तिने सततच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून आज राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.


सदरील कुटुंबीय भूमीहिन असून मोल मजुरी करुन आपली उपजीविका भागवत. मृत महिलेला एक मुलगा आणि एक मलुगी आहे. मृत महिलेच्या नातेवाईकाच्या फिर्यादीवरुन ३ जणांविरोधात विरोधात गोरेगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीदेवी पाटील, राहुल गोटरे यांनी भेट दिली.

Post a Comment

أحدث أقدم