फोन करणाऱ्याचे नाव दिसणारलवकरच ट्रायकडून सुरू होणार सेवा

फोन करणाऱ्याचे नाव दिसणार
लवकरच ट्रायकडून सुरू होणार सेवा

महाराष्ट्र24 न्यूज नेटवर्क
17 नोव्हेंबर 2022
नवी दिल्ली: भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्रायकडून (टीआरएआय) आता लवकरच एक महत्त्वाची सेवा सुरू . केली जाणार आहे. त्याद्वारे आता जो "व्यक्ती तुम्हाला कॉल करेल. त्याचे नाव मोबाईल फोनमध्ये सेव केलेले नसले तरीही ते तुम्हाला दिसणार आहे. आपल्यापैकी प्रत्येकाला अनेक वेळा अनोळखी नंबरवरून आलेले कॉल उचलण्याचा कंटाळा येतो. तर काहीना अनोळखी नंबरची भीती देखील वाटते. ही सेवा सुरू झाल्यास हा ताप कमी होणार आहे. शिवाय कॉलरची खरी माहिती समोर येईल.

या योजनेअंतर्गत आता जर एखाद्या व्यक्तीला नवीन सिमकार्ड घ्यायचे असेल तर त्यासाठी भरण्यात येणारा केवायसी फॉर्मवर त्याला स्वतःची सर्व खरी माहिती भरावी लागेल. शिवाय त्या फॉर्मवर सिम कार्ड वापरकर्त्याचे जे नाव असेल तेच नाव त्या व्यक्तीने इतरांना कॉल केल्यावर दिसणार आहे.

आता मिळणार
• १०० टक्के खरी माहिती

अनोळखी नंबरवरून आलेल्या कॉलमुळे अनेक लोकांची आर्थिक फसवणूक झाल्याची . उदाहरणे आपण पाहिली आहेत. त्यामुळे आता अनोळखी नंबरवरून लोकांची फसवणूक करणाऱ्यांवर काही प्रमाणात आळा बसणार आहे. दरम्यान, सध्या देखील आपल्याला अनोळखी नंबर कोणाचा आहे हे पाहता येते. त्यासाठी आपण काही अॅप्सचा वापर देखील करतो. मात्र, यामध्ये मोबाईलमधील डाटा विकण्याची शक्यता असते.

Post a Comment

أحدث أقدم