मा. आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांची हिंगोली मतदारसंघात पुन्हा ताकद वाढली

मा. आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांची हिंगोली  मतदारसंघात पुन्हा ताकद  वाढली


महाराष्ट्र 24 न्यूज 
नेटवर्क17 नोव्हेंबर 2022

हिंगोली- काँग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेमध्ये हजारोंच्या संख्येने हिंगोली विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी भारत जोडो यात्रेत मोठ्या प्रमाणात
 सहभाग नोंदविला होता
 त्याबद्दल  त्यांचा मनापासून आभारी आहे, अशी भावना माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी व्यक्त केली.
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रा  दरम्यान  मा. आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांची पुन्हा एकदा ताकद वाढल्याची दिसून आले

जांभरून आणि येथील महिलांचा सहभाग 
 सोमवार दिनांक 14 नोव्हेंबर रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सावरखेडा  येथून हिंगोली विधानसभा क्षेत्रात दाखल झाली. या पदयात्रेमध्ये संपूर्ण हिंगोली विधानसभा मतदारसंघातील हजारो नागरिक व कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला. होता हिंगोली शहरात न भूतो न भविष्यती अशी पदयात्रा अनुभवास मिळाली. नागरिकांच्या प्रचंड प्रतिसादामुळे संपूर्ण हिंगोली शहर गजबजून गेले होते. एवढेच नव्हे तर सायंकाळी अंधार पडल्यावर देखील माळहिवरा पाटी पर्यंत नागरिकांनी राहुल गांधी यांच्यासोबत पदयात्रा पूर्ण केली. तसेच वडद फाटा ते कनेरगाव नाका प्रयत्न मोठ्या प्रमाणात जनसागर उसळला जवळपास 25 हजार लोक उपस्थित होते. नागरिकांच्या प्रतिसादाचे स्वतः राहुल गांधी यांनी भाऊराव पाटील गोरेगावकर यांचे   व्यक्तिशः कौतुक देखील केले. या प्रतिसादाच्या या माध्यमातून हिंगोली विधानसभेमध्ये काँग्रेस पक्ष आजही तळागाळापर्यंत पोहोचला असून तेवढाच मजबूत आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात परिवर्तन अटळ असेल अशी भावना माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी बोलताना व्यक्त केली. त्याचबरोबर या पदयात्रेसाठी काँग्रेसचे वरिष्ठ नेते, स्थानिक पदाधिकारी व तळागाळातील परिश्रम घेणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे देखील त्यांनी आभार व्यक्त केले आहेत.
या भारत जोडो  यात्रेमुळेच मा.आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांचे ताकद वाढल्याचे चित्र दिसून आले

Post a Comment

أحدث أقدم