कनेरगाव नाका कानरखेडा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी

 कनेरगाव नाका  कानरखेडा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी
हिंगोली तालुक्यातील कनेरगाव नाका येथे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त दिनांक 14 एप्रिल 2023 रोजी सकाळी 10 वाजता महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला कनेरगाव नाका येथील जयंती अध्यक्ष  निखिल रमेश कांबळे उपाध्यक्ष विपुल दिलीप रसाळ व सरपंच सौ.स्वाती गावंडे, उपसरपंच निलेश दहात्रे, ग्रामसेवक ज्ञानेश्वर मलवाड,  ग्रामपंचायत  सदस्य , ग्रामपंचायत सेवक, लिपिक, व गावातील प्रतिष्ठित नागरिक व सोबत पूर्ण कनेरगावातील उपासक व उपसिका ऊपस्थित होते. दिनांक 14 एप्रिल 2023 रोजी कनेरगाव नाका येथे आज शांततेत जयंती निमित्त पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली. येत्या 30 यप्रिल ला मोठ्या उत्साहाने मिरवणूक निघणार आहे असे  अध्यक्ष यांनी सांगली 
 दरवर्षीप्रमाणे यावर्षी कनेरगाव नाका येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी. करण्यात आली 
कानरखेडा
 खुर्द येथे  दिनांक 14 एप्रिल 2023 रोज शुक्रवारी मोठ्या उत्साहाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.  ग्रामपंचायत व जयंती अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात यावी त्या अनुषंगाने कानरखेडा खुर्द येथे सरपंच मनकर्णा बाई राऊत, उपसरपंच दत्ता कष्टे , पोलीस पाटील वर्षा व
  राऊत, ग्रामसेवक गणेश  शिंदे,  ग्रामपंचायत सदस्य संतोष टोणचर,  भारत ठाकरे, कर्मचारी प्रभू पवार, सुनील भगत, गुलाब भगत व सर्व गावकरी तसेच सर्व भीम बांधव उपस्थित होते.  त्यामध्ये सरपंच व उपसरपंच यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला हार  आणी पुष्प अर्पण केले. नंतर गावातून शांततेत मिरवणूक काढण्यात आली.
कनेरगाव नाका जिल्हा परिषद शाळेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहाने साजरी.
 कनेरगाव  नाका येथे जिल्हा परिषद प्रशाला   दिनांक 14 एप्रिल 2023 रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार  अर्पण करून  शाळेमध्ये जयंती साजरी करण्यात आली . यावेळी  एस. एन. आळणे, श्रीमती भावसार मॅडम ,श्रीमती नथवानी,श्रीमती ठाकूर मॅडम यांची उपस्थिती होती.

Post a Comment

أحدث أقدم