सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती विविध कार्यक्रमाने उत्साहात साजरी
महाराष्ट्र24 नेटवर्क नेटवर्क
14 एप्रिल 2023
हिंगोली , सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आज दिनांक 14 एप्रिल, 2023 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, हिंगोली येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनावर आधारित प्रा.गजानन बांगर यांचा मुख्य व्याखानाचा कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाच्या प्रारंभी महामानवाच्या प्रतिमेचे प्रा.गजानन बांगर, महाराष्ट्र राज्य समाज भूषण पुरस्कारार्थी संघटनेचे राजाध्यक्ष तथा महात्मा ज्योतिबा फुले पुरस्कार विजते डॉ.विजय निलावार, व्यापारी महासंघाचे प्रकाश सोनी, समाज कल्याणचे सहायक आयुक्त शिवानंद मिनगीरे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजु एडके, मिलींद मोरे, मिलींद उबाळे, हर्षवर्धन परसवाळे, निरज देशमुख, विशाल इंगोले, सिध्दार्थ गोवंदे, सत्यजीत नटवे आदी मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन दिपप्रज्वलन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवानंद मिनगीरे यांनी केले. तर सुत्रसंचालन अशोक इंगोले यांनी केले. यावेळी हिंगोली जिल्हाभरातून 250 ते 300 नागरिक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
तद्नंतर हिंगोली बसस्थानकात बसस्थानक प्रमुख यांच्या उपस्थितीमध्ये बसस्थानकातील व बस मधील प्रवासी यांना जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने जातीचे प्रमाणपत्र पडताळणी व त्यासाठी लागणारे पुरावे / कागदपत्रे याबाबतची माहिती पत्रके, भिंती पत्रके तयार करुन हिंगोली बसस्थानकातील आगार प्रमुख थोरबोले यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
तसेच जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण, माजी नगरसेवक जगजीत खुराणा, समाज भूषण पुरस्कारार्थी मधुकर मांजरमकर, डॉ.विजय निलावार, पुतळा समितीचे सर्व सदस्य यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पुजन व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करुन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने 200 पेक्षा अधिक मागासवर्गीय विद्यार्थ्यांना त्यांचे जातीचे प्रमाणपत्र वैधता करुन मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
जातीचे प्रमाणपत्र पडताळणी कोणी व त्यासाठी लागणारे पुरावे / कागदपत्रे या बाबतचे माहिती पत्रके, भिंती पत्रके उपस्थित नागरीकांना वाटप करण्यात आले. जातीचे प्रमाणपत्र वैधता करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या माहिती पत्रकाचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर व पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांनी कौतुक केले.
त्यानंतर मान्यवरांचे हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यासाठी आलेल्या 1500 हून अधिक नागरिकांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी इतर मागास बहुजन कल्याण विभाग व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, बार्टी,हिंगोली यांनी अथक परिश्रम घेतले.
إرسال تعليق