होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युएल हंनेमन यांची जयंती उत्साहात
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
15एप्रिल 2023
सीसीएमपी परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल कनेरगाव नाका येथील डॉ. दीपक ठाकरे यांचा सत्कार
वाशिम जिल्ह्यातील होमिओपॅथी डॉक्टरांच्या पुढाकारातून 10 एप्रिल रोजी असाध्य व जुनाट रुग्णांना वरदान ठरणाऱ्या होमिओपॅथीचे जनक सर डॉ. सॅम्युएल हनेमन यांचा जन्मदिन जागतिक होमिओपॅथी दिवस म्हणून अकोला नाका परिसरात उत्साहात साजरा करण्यात आला.
तद्वतच होमिओपॅथी डॉक्टरांचे प्रश्न सर्वांच्या सहभागातून सोडविण्यासाठी या कार्यक्रमात सर्व समतीने वाशिम जिल्हा होमिओपॅथी डॉक्टर असोसिएशनची स्थापना करून पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
कार्यक्रमात होमिओपॅथी सोबतच ऍलोपॅथीच्या उपचारासाठी महत्त्वाची असलेली सीसीएमपी ही कठीण परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल कनेरगाव नाका येथील डॉ. दीपक ठाकरे आणि वाशिम जिल्ह्यातील डॉ. अमित पुरोहित डॉ. सुरेश गोरे डॉ. गणेश मते डॉ. रवींद्र जायभाय डॉ. मदन कुटे डॉ. यादव जाधव डॉ. राजेंद्र सोनी आदींचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ होमिओपॅथी तज्ञ डॉक्टर सरनाईक तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सात्विक बावणे डॉ सुरेश गोरे डॉ.भारती बियाणी डॉ. विजय बळी डॉ. सोनी यांची उपस्थिती होती प्रारंभी माता सरस्वती स्तवन व दीपप्रज्वलन करण्यात आले त्यानंतर डॉ. सॅम्युएल हनेमन यांच्या प्रतिमेला अध्यक्ष व प्रमुख पाहुण्याच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
प्रास्ताविकातून डॉ. कपिल वानखेडे यांनी होमिओपॅथीचे जनक सर डॉ. सॅम्युएल हनेमन यांचे विषयी माहिती देऊन सर्व मानव जातीच्या कल्याणासाठी निर्माण केलेली होमिओपॅथी ही रुग्णासाठी वरदान असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाला डॉ. अमित चव्हाण, डॉ.संजय होते, डॉ. संदीप वाघ, डॉ. छाया बोर्चाटे, डॉ. कीर्ती सोनी, डॉ. संजीवनी चव्हाण, डॉ. प्रीती राऊत, डॉ. वैशाली मंडळ, डॉ.अनुराग वैद्य, डॉ.अश्विन बल्लाळ, डॉ. मीनाक्षी गवळी, डॉ.दिपाली दागडिया ,डॉ. सुजाता कुटे ,डॉ. मनीषा बकाल, डॉ. विश्ववंती अंभोरे, डॉ. राहुल देशमुख, डॉ. बाबाराव देशमुख, डॉ. पल्लवी देशमुख तसेच शहरातील होमिओपॅथी जनरल प्रॅक्टिशनर डॉ. गणेश मते, डॉ.अमित पुरोहित ,डॉ. दीपक ठाकरे, डॉ. मालेगाव येथून डॉ. ओंकार शेट्टी डॉ. निलेश मारू डॉ. मदन कुटे, डॉ. रवींद्र जायभाय, डॉ. नारायण मंत्री, कारंजा येथून डॉ सुवर्णा राऊत यांच्यासह जिल्ह्यातील अनेक होमिओपॅथी डॉक्टर्स मंडळीची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सपना राठी तर आभार प्रदर्शन डॉ.प्रफुल वानखेडे यांनी केले.
إرسال تعليق