मनोज जरांगे यांना जीवे मारण्याची धमकी

मनोज जरांगे यांना जीवे मारण्याची धमकी

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क 
25 ऑक्टोबर 2024
आंतरवली सराटीः मराठा आरक्षणासाठी लढणारे नेते मनोज जरांगेंना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार म्हणून येणार आणि गेम करणार, अशी धमकी एका युट्युब चॅनलच्या कमेंटमधून दिली आहे. एका

जरांगेच्या सुरक्षेत वाढ
अज्ञाताने ही धमकी दिली असू यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या धमकीनंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

युट्युबवरील एका चॅनलच्या कमेंटमध्ये बजाज बिश्नोई लीडर नावाच्या फेक अकाउंटवरून ही धमकी देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार म्हणून येणार आणि गेम

करणार, अशा आशयाची ही धमकी आहे. ऐन निवडणुकीत मनोज जरांगेंना धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या धमकीनंतर मनोज जरांगे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून जरांगे बसत असलेल्या सरपंच मळा येथे पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. तसेच जरांगेंना भेटण्यासाठी येणाऱ्या सर्वांची तपासणी होणार असल्याचे समजते.

Post a Comment

أحدث أقدم