नकली नोटा बाळगल्या प्रकरणातील दोन्ही आरोपींची जामीन मंजूर
ॲड अजय उर्फ बंटी देशमुख
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
01मार्च 2026
हिंगोली पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या नकली नोटा बाळगल्या प्रकरणातील दोन्ही आरोपींना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या निर्णयामुळे शहरात या प्रकरणाची चर्चा रंगली आहे.
सदर प्रकरणी हिंगोली शहर पोलीस स्टेशन येथे गु.र.न. 824/2025 अन्वये कलम 180, 179, 3(5) भारतीय न्याय संहिता अंतर्गत दि. 07/11/2025 रोजी गुन्हा नोंदविण्यात आला होता.
फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, दि. 06/11/2025 रोजी मा. पोलीस निरीक्षक साहेबांसह पोलीस पथक निवडणूक अनुषंगाने पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, देवानंद उर्फ सोनु शिवाजी जाधव व त्याचा मित्र संस्कार अशोक खंदारे यांच्या जवळ भारतीय चलनी नोटांसारख्या दिसणाऱ्या नकली नोटा आहेत. मिळालेल्या माहितीनुसार छापा टाकण्यात आला असता आरोपींकडून सुमारे रु. 4,500 किमतीच्या नकली नोटा जप्त करण्यात आल्या. त्यानंतर संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणातील अटक आरोपी देवानंद उर्फ सोनु शिवाजी जाधव व संस्कार अशोक खंदारे यांनी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी, हिंगोली न्यायालयात ॲड. अजय (बंटी) पंडीतराव देशमुख यांच्या मार्फत जामीन अर्ज दाखल केला होता.
दि. 05/02/2026 रोजी श्रीमती पी. आर. पमनानी, विद्यमान न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी, हिंगोली यांनी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून दोन्ही आरोपींना जामीन मंजूर केला.
आरोपींच्या वतीने ॲड. सतीश देशमुख, ॲड. शामकांत देशमुख, ॲड. प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड. अजय (बंटी) पंडीतराव देशमुख यांनी प्रभावी युक्तिवाद केला. त्यांना ॲड. शरद देशमुख, ॲड. अदित ऊर्फ शुभम देशमुख, ॲड. राहुल देशमुख, ॲड. योगेश खिल्लारी (पाटील), ॲड. अविनाश राठोड, ॲड. रजत देशमुख, ॲड. प्रकाश मगरे, ॲड. आनंद खिल्लारे, ॲड. सुमित सातव, ॲड. मुदस्सीर अ. रहिम, ॲड. लखन पठाडे, ॲड. श्रद्धा जैस्वाल, ॲड. आकाश चव्हाण, ॲड. गजानन घुगे, ॲड. सुजित गायकवाड, ॲड. सुमित कदम, ॲड. रुपाली खिल्लारे, शेख आदिल शेख अजीस, ॲड. शिवम देशमुख, ॲड. संदीप डवले, ॲड. तुषार देशमुख, ॲड. सचिन सोनुने, ॲड. प्रिया मॅडम आदींनी सहकार्य केले.
إرسال تعليق