कारवाडी शिवारातील तिर्रट जुगार अड्ड्यावर ग्रामीण पोलिसांचा धाडसी छापा; आठ जणांवर गुन्हा दाखल, ₹10 हजार 600 रोख जप्त
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
28 जुलै 2026
हिंगोली | प्रतिनिधी
हिंगोली ग्रामीण पोलिसांनी कारवाडी शिवारातील दक्षता नगर येथे सुरू असलेल्या अवैध तिर्रट जुगार अड्ड्यावर धाड टाकत आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत पोलिसांनी ₹10 हजार 600 रुपयांची रोख रक्कम जप्त केली असून, या प्रकरणामुळे अवैध जुगार व्यवसाय करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २६ जुलै रोजी कारवाडी शिवारातील दक्षता नगर परिसरात तिर्रट जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे यांना मिळाली. माहितीची खातरजमा होताच त्यांनी तातडीने विशेष पथक घटनास्थळी रवाना केले.
पोलिसांनी अचानक छापा टाकत जुगार खेळणाऱ्या आठ जणांना ताब्यात घेतले. कारवाईदरम्यान घटनास्थळावरून ₹10 हजार 600 रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. त्यानंतर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
फिर्यादी शामराव जावळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून खालील आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
बंधू लक्ष्मण गडाळे
शेख साजेश शेख लाल (रा. रिसाला बाजार, हिंगोली)
जुनेदखान गफारखान पठाण (रा. आजम कॉलनी, हिंगोली)
शंकर प्रकाश सावळे (रा. नवीन पोलिस कॉलनी, हिंगोली)
लक्ष्मण भानुदास वाव्हळ (रा. दाटेगाव, ता. जि. हिंगोली)
निलेश पंडित देशमुख (रा. आनंद नगर, हिंगोली)
राहुल प्रकाश जाधव (रा. रामाकृष्ण कॉलनी, हिंगोली)
शंकर नागोराव गिरी (रा. भांडेगाव, ता. जि. हिंगोली)
या संपूर्ण कारवाईमुळे परिसरातील अवैध जुगार अड्डे चालविणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, ग्रामीण पोलिसांकडून अशा अवैध धंद्यांविरोधात कारवाईची मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी बाळासाहेब खोडवे करीत आहेत.
إرسال تعليق