इन्स्टाग्राम स्टोरीवरून वाद; आंबेडकर व संविधानाबाबत अवमानकारक वक्तव्य गुन्हा दाखल आरोपी ताब्यात
पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
हिंगोली
औंढा नागनाथ, दि. २७ जुलै : इन्स्टाग्रामवरील आक्षेपार्ह स्टोरीवरून झालेल्या वादातून अनुसूचित जातीतील तरुणाचा जातीवाचक अपमान करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधानाबाबत अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात एकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रक्षक मुरलीधर गायकवाड (वय २४, व्यवसाय मजुरी, रा. सिद्धार्थ नगर, ता. औंढा नागनाथ, जि. हिंगोली) यांनी दिलेल्या तोंडी फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, दि. २६ जुलै २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७.४१ वाजण्याच्या सुमारास औंढा नागनाथ येथील हेडगेवार चौक परिसरात फिर्यादी हे इन्स्टाग्रामवर टाकलेल्या आक्षेपार्ह स्टोरीबाबत विचारणा करण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपी प्रथमेश विलास हुडेकर (रा. औंढा नागनाथ, जि. हिंगोली) याने दुसऱ्या आरोपी राम उर्फ राम बालाजी वैद्य (इन्स्टाग्राम आयडी : ram_015a56, संपूर्ण पत्ता उपलब्ध नाही) याने टाकलेल्या स्टोरीचे समर्थन करत फिर्यादीला जातीवाचक शब्द वापरून अपमानित केल्याचा आरोप आहे.
तसेच, "तुमच्या संविधानाला व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मी मानत नाही," अशा स्वरूपाचे अवमानकारक वक्तव्य करून सार्वजनिक ठिकाणी फिर्यादीचा अपमान केल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रकरणी औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा क्र. ६७८/२०२६ दाखल करण्यात आला असून भारतीय न्याय संहितेच्या कलम १९६, ३(५) तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
या प्रकरणातील प्रथम आरोपी प्रथमेश विलास हुडेकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अधीक्षक श्रनिक लोढा उपविभागीय पोलीस अधिकारी वाघ पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे
إرسال تعليق